Skip to content Skip to footer

मी वेबसाईट साठी सहज वही आणि पेन हातात घेतला … .तेव्हा मला आठवलं ते व. वा वाचनालय जळगावात भरवलेल माझं पहिलं प्रदर्शन… .जे 2013 साली मी काॅमप्पुटर पेटिंगच प्रदर्शन भरवण्याचा विचार केला तेव्हा माझ्या मनांत धाकधूक होती  की माझे पेटिंग लोकांना आवडतील का?लोक काय म्हणतील इत्यादी या विचाराने मी खुप अस्वस्थ झालो होतो. पण जस जस प्रदर्शन लोकांना आवडू लागलं तसे लोक पेटिंग बद्दल जाणू लागले, बोलू लागले तसाच मांझा ऊत्साह आणखीनच वाढू लागला पहिलं प्रदर्शन भरवंल तेव्हा मी फाऊंडेशन डिप्लोमा कोर्स करत  होतो – ( पायाभूत वर्ग. ) तेव्हाच मी ठरवलं की मला ड्रॉईंग क्षेत्रांत करीअर करायचं आहे. मला कुठेतरी जाणवतं होत की माझं पेटिंग चांगल आहे  मला लहानपणापासूनच ड्रॉईंगची आवङ आहे. वयाच्या ७व्या,  वर्षापासून ते आतापर्यंत. त्यांच्यानंतर मी आयोजित केलेलं पुना गाडगीळ आर्ट गॅलरी जळगाव हे अब्स्ट्रॅक्ट, माॅङन आर्टच प्रदर्शन हे माझं जळगावातल दुसरं प्रदर्शन त्या प्रदर्शनांनी मला स्वःताची ओळख दिली. माझे पेटिंग लोकांना खुप आवडले प्रदर्शनांचा निर्मिताने लोकांच्या परिचय होऊ लागला. वेगवेगळी माणसं भेटली.-  मला मोठा आर्टीस असल्या सारखं वाटत होतं त्याचानंतर पुणयातलं राजा रवी वर्मा आर्ट गॅलरीत भरवलेलं माझं तिसर प्रदर्शन होत त्या प्रदर्शनांलाही रसिक पुणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. राजा रवी वर्मा आर्ट गॅलरीने मला बरंच काही दिलं जर मी राजा रवी वर्मा आर्ट गॅलरीत प्रदर्शन भरवंल नसतं तर पुढच्या प्रदर्शनांला मुकलो असतो कायमचाच… .!

ती पुढची संधी महणजे`जहांगीर आर्ट गॅलरीची 2019 साली जगप्रसिद्ध असलेली जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई येथे माझे दोन पेटिंग सिलेक्ट झाले तो माझ्यासाठी  आनंदाचा क्षण होता जहांगीर आर्ट गॅलरी माझी स्वप्नं पूर्ती होती ते स्वप्नं पूर्ण झाल्या चा आनंद आहे… .जेव्हा जहांगीर आर्ट गॅलरीत माझे पेटिंग सिलेक्ट झाल्याच लेटर आलं तो आनंद माझ्यासाठी खूपच अनमोल होता. मी जहांगीर आर्ट गॅलरीत माझ्या पेटिंगसोबत ऊभा होतो तेव्हा मला इंटरनॅशनल लेवलचा आर्टीस असल्या सारखं वाटत होतं आपलं नाव जहांगीर  आर्ट गॅलरीत सिनियर आर्टीससोबत लिस्ट मध्ये येतं तेव्हा आभाळाला हात टेकल्याचा आनंद होतो तो आनंद कोणत्याही शब्दात व्यक्त करता येत नाही. जहांगीर आर्ट गॅलरीतलं हे माझं चौथं प्रदर्शन होत. त्याचानंतर सिमरोझा आर्ट गॅलरी मुंबई हे माझं पाचव प्रदर्शन होतं मी जी.ङी आर्ट च्या फाईनल ईयरला ॲपीअरींग आहे. अशारितीने माझ्या कला विश्वासातला प्रवास… .सुरू आहे. माझ्या या प्रवासात मला आदरणीय सरसंघचालक श्री   मोहनजी भागवत,चित्रपट दिग्दर्शक श्री  राज  दत्त, श्री उज्वल निकम, खगोलशात्रज्ञ श्री ङाॅ जयंत आणि सौ मंगला नारळीकर  ॲङ गुरू  श्री भरत दाभोळकर शिल्पकार श्री प्रमोद कांबळे, प्रसिद्ध  चित्रकार श्री बोधनकर अशा अनेक मान्यवरांनी मला प्रोत्साहन व मार्गदर्शन केले आहे.

मला शालेय व काॅलेज जीवनात  चित्रकले विषयी मार्गदर्शन केलेले सर व दीदी   पुनम दहीभाते दीदी, श्री ज्ञानेश्वर पाटील सर, श्री नितिन  सोनवणे सर,श्री प्रविण पाटील सर श्री  सुपलकर सर, श्री गिरीश बङगुजर सर,   श्री योगेश सुतार सर यांनी मार्गदर्शन केले तसेच श्री राजेंद्र महाजन सर,  श्री सुबोध व सौ शमा सराफ , श्री प्रदिप रस्से, श्री गिरीश कुलकर्णी, श्री विनीत कुबेर  श्री तरूण भाटे सर, श्री प्रेमकुमार सपकाळे सर तसेच पुण्याला प्रदर्शनाच्या  उदघाटन प्रसंगी उपस्थित राहिलेले ङाॅ.श्री  सागर तळेकर, श्री प्रशांत गायकवाड, जेष्ठ चित्रकार श्री मिलिंद फडके या मान्यवरांनी माझे पेटिंग  बघून मला प्रोत्साहन व मार्गदर्शन केले . मी जी.ङी आर्ट अभ्यासक्रम पूर्ण करत असतांना मला एकूण पाच प्रदर्शने  जळगाव, मुंबई, आणि पुणे येथे स्वः ताचे   प्रदर्शने  भरवण्याचा योग आला. या प्रवासात काॅलेजचे प्राचायॆ श्री जितेंद्र भांरबे सर यांनी मार्गदर्शन आणि  प्रोत्साहन दिले ,त्यांचा  मोलाचां वाटा आहे.

मांझा चित्रकलेचा व.वा वाचनालय ते जहांगीर आर्ट गॅलरीतला तो क्षण… .तो प्रवास… . माझ्यासाठी खुपच प्रेरणादायी होता.

-शिवम संजीव हुजूरबाजार.

Leave a comment