Skip to content Skip to footer
Loading Events

« All Events

  • This event has passed.

Visit by Jayant Kulkarni, director of Avirat Prakashan

July 4, 2021

________

संपूर्ण तू … स्वयंपूर्ण तू …
सिद्धांताचा गिरीवर … व्यक्त आनंद तू
शिवम तू … सत्यम् तू …
चित्रातला मौन उद्याचा तपस्वी कलावंत तू
सिद्धांताचा गिरीवर … व्यक्त आनंद तू

सांगायचे तुला काही .. ते सारेच
तू चित्रातून बोलसी अखंड
तुझी व्यक्तबिंदूंची परिभाषा
शिवम तू सत्यम् तू .. उदंड
संपूर्ण तू … स्वयंपूर्ण तू …
सिद्धांताचा गिरीवर … व्यक्त आनंद तू

गिरवीसी काय
कोण ओळख तुझी
कुणा ठाऊक नसे … काही काही
तुझा अभिमान मान झळाळे शाही
संपूर्ण तू … स्वयंपूर्ण तू …
सिद्धांताचा गिरीवर … व्यक्त आनंद तू

गूढ कल्पकता असीम
दृढ सातत्य तू निस्सीम
समर्पित तुझा प्रत्येक निमिष
कला शैलीदार सिद्ध अप्रतिम
संपूर्ण तू … स्वयंपूर्ण तू …
सिद्धांताचा गिरीवर … व्यक्त आनंद तू

रेखाटले अवघे अंतरंग… तुझे तू
बोलक्या जागा सांगतात… दिग्गज तू
चितारलेले रंग म्हणती… तूच तू सर्वत्र तू
सरस तू .. निर्मळ तू .. प्रगल्भ रंगशूर तू
संपूर्ण तू … स्वयंपूर्ण तू …
सिद्धांताचा गिरीवर … व्यक्त आनंद तू

किमया तुझी न्यारी करारी
आकार घेणार… सत्वरी उमदा भरारी
सुखदा तुझा .. कलेचा मुक्तदंग वावर
बा ! रे `शिवम´ उत्तुंग कर तुझी तैय्यारी
संपूर्ण तू … स्वयंपूर्ण तू …
सिद्धांताचा गिरीवर … व्यक्त आनंद तू

अनल्प तुझे व्यासपीठ
संकल्प तुझे सिद्धवर्ती थेट
नाते तुझे सृष्टिशी अजोड
तू जिंकलेला `स्वयं शांतिराजमुकुट´
संपूर्ण तू … स्वयंपूर्ण तू …
सिद्धांताचा गिरीवर … व्यक्त आनंद तू
___________

©️ जयंत एस कुलकर्णी / द्रष्टा
…… (पामराची झरणी)
10 जुलै 2021 / सायंकाळी 06:19

गूढ व विविधांगी रंग छटा चित्रबद्ध करणारा
उदयान्वित युवा चित्रकार
चि. शिवम हुजूरबाजार यांसि
अभिनंदनार्थ हे शब्द समर्पित … 🌼
शिवम खूप उंच भरारी घे
तुला अनेकोत्तम शुभ आशीर्वाद !

Details

Date:
July 4, 2021
Event Category:

Venue

Jalgaon, Maharashtra
344 Acharya complex, Jaikisan wadi
Jalgaon, Maharashtra 425001 India
+ Google Map
Phone:
98600-88498
Website:
www.shivamhuzurbazar.com